विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. बर्याच दिवसा पासून लिहायचे होते. खरे तर मासिक , वर्तमान
पत्र यात लिखाण करून बरीच वर्ष लोटली. नव्या युगाचे माध्यम ब्लॉग पण होते पण ती
वेळ काही येत नव्हती. लिहीण्या सारखे विषय सुद्धा होते. पण... सुरवात काही होत
नव्हती. दसरा,पाडवा असे ब्लॉग सुरु
करण्यासाठी मनात ठरवलेले दिवस आले आणि गेले पण ब्लॉग
काही सुरू झाला नाही असो, पण आता नियमीत पणे लिहायचे
ठरवले आहे. वेळ मिळाला तर technical विषयावर लिहायचे
ठरवले आहे. ब्लॉग ला जर चांगला प्रतिसाद मिळाला तर English version सुरु करायचा मानस आहे. हे
लिहिताना काही गोष्टी लक्षात आल्या. मी आजही पूर्वी सारखा सलग लिहू शकतो. अरे हो
आता भाषा सुद्धा Marathi + English झाली आहे आणी शुद्ध लेखन आता
पूर्वी सारखे शुद्ध राहिले नाही. असे असले तरी हा प्रयत्न आपणास निश्चीत आवडेल असे वाटते.
आपल्या सूचना ,अभिप्राय अवश्य कळवा.
No comments:
Post a Comment