Thursday, 22 October 2015

मोरारजी देसाईंना निशान-ए-पाकिस्तान सन्मान का मिळाला ?

निशान-ए-पाकिस्तान हा पाकिस्तान सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. मोरारजी देसाई हे हा सन्मान मिळवणारे प्रथम भारतीय आहेत. भारताला नेहमी पाण्यात पाहणाऱ्या पाकिस्तानने हा सन्मान भारताच्या पंतप्रधानाला का दिला असावा ? पाकिस्तानच्या दृष्टीने शत्रू असणाऱ्या भारताच्या पंतप्रधानाने असे काय केले जे पाकिस्तानच्या हिताचे होते आणी त्या बद्दल भारताच्या पंतप्रधानाला हा पाकिस्तान सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान दिला गेला ?

महाराष्ट्र मोरारजी देसाईना ओळखतो ते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे खलनायक म्हणून , हे मोरारजी 1977 साली भारताचे पंतप्रधान झाले. इंदिरा गांधीनी RAW तसेच central Inteligance Agency चा वापर विरोधी पक्षां विरुद्ध केल्याच्या संशया मुळे  देसाईना यांनी RAW ची बजेट ३० टक्यांनी कमी केले.
खरे तर  R N काव यांच्या नेतृत्वामुळे  RAW च्या कामगिरीची जागतीक नेत्यांनी प्रशंसा केली होती पण देसाईनि काव यांनाच रजेवर जाण्यास भाग पाडले.
पाकिस्तानचे लष्करी प्रशासक झिया उल हक हे मोरारजी देसाईना शिवांबू चिकित्से बाबत मार्गदर्शन घेण्यासाठी फोन करत. खरे तर त्यावेळी झियांनाच जागतीक नेत्यांच्या पाठींब्या ची गरज होती, बोलण्याच्या ओघात देसाई यांनी भारताला पाकिस्तानच्या गुप्त अण्वस्त्र कार्यक्रमा विषयी माहिती आहे असे सांगून टाकले.   त्या मुळे सावध झालेल्या पाकिस्तानने  RAW च्या हेरांना ठार मारले. त्या मध्ये भारताला  पाकिस्तानच्या काहुटा च्या अण्वस्त्र कार्यक्रमा विषयी blue print देण्यास तयार झालेल्या हस्तकाचा हि समावेश होता.
काही दिवसांपूर्वी भारताच्या २ पंतप्रधानांनी Deep Assets ला वाऱ्यावर सोडले असा आरोप विद्यमान संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी केला होता. त्यांचा रोख देसाई यांच्या कडेच होता. 
खरे तर 1977 साली मोरारजी देसाई  पंतप्रधान होण्यापूर्वीच RAW ला काहुटा येथे पाकिस्तान अणू बॉम्ब बनवण्या च्या तयारीत आहे का हे शोधण्याची कामगिरी दिली होती. त्या साठी RAW चा एक हेर काहुटा जवळील एका hair-cutting saloon मध्ये पाठवण्यात आला. त्या हेराने   पाकिस्तानी शास्त्रज्ञांच्या केसांचे samples गोळा केले. त्या samples ची तपासणी करण्यात आली  त्या samples  च्या  तपासणी  मध्ये युरेनियम सापडले आणी RAW ची भीती खरी ठरली.
  मोरारजी देसाई यांची ही पराक्रम गाथा इथेच थांबत नाही.. याच दरम्यान इस्त्रायली परराष्ट्र मंत्र्यांनी एका गुप्त बैठकीत भारताकडे  इस्त्रायली विमानांना भारतात इंधन भरण्याची परवांगी मागितली. इस्त्रायलला पाकिस्तानच्या काहुटा अणु भट्टी ला नष्ट करायचे होते आणी त्या लढाऊ विमानांना भारताने  इंधन भरण्याची परवांगीद्यावी ही एक च अपेक्षा इस्त्रायलची होती पण  मोरारजी देसाई यांनी तो बेत हाणून पाडला.

अशा ह्या मदतगार माणसाला पाकिस्तानने निशान-ए-पाकिस्तान हा सन्मान दिला नसता तरच नवल !!!

4 comments:

  1. प्रथमतः आपले या विश्वात स्वागत!! आजकाल लिहिते आणि वाचते होण फार आवश्यक आहे.
    आपण पहिलाच निवडलेला विषय अतिशय मार्मिक आहे.
    पाक ला येन-केन-प्रकारेण मदत करणार्यात पूर्वी पासूनच आपले राजकारणी (काही) अग्रसर आहेत हे आपल् दुर्दैव म्हणाव लागेल.

    ReplyDelete
  2. प्रथमतः आपले या विश्वात स्वागत!! आजकाल लिहिते आणि वाचते होण फार आवश्यक आहे.
    आपण पहिलाच निवडलेला विषय अतिशय मार्मिक आहे.
    पाक ला येन-केन-प्रकारेण मदत करणार्यात पूर्वी पासूनच आपले राजकारणी (काही) अग्रसर आहेत हे आपल् दुर्दैव म्हणाव लागेल.

    ReplyDelete
  3. इस्रायेल ला पाकिस्तान विरुद्ध मदत करायचा टाळले होते हे माहित नव्हते. शिवांबू वर सल्ले देताना आपल्या देशाचे गुप्त मोहोमे बद्दल माहिती देणारा नालायक माणूस पंतप्रधान म्हणून लाभणे हे आपल्या देशाचे दुर्र्भाग्य.

    ReplyDelete